प. बंगालमध्ये सायकलला ‘अच्छे दिन’

‘एनएफएचएस’ची पाहणी : दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश
NFHS increasing air pollution health Bicycle options West Bengal Kolkata
NFHS increasing air pollution health Bicycle options West Bengal Kolkataesakal

कोलकता : हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्वयंचलित वाहनांना सायकल पर्याय असल्याने व आरोग्यासाठीही सायकल चालविण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे या परंपरागत वाहनाला चांगले दिवस आले आहे. देशभरात सायकलींचा टक्का वाढत असून पश्‍चिम बंगालमध्ये त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा (एनएफएचएस-५) नुसार येथील ७८.९ टक्के कुटुंबांमध्ये सायकली आहेत.

सायकलच्या वापराची राष्ट्रीय सरासरी टक्केवारी ५०.४ आहे. या क्रमवारीत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून तेथील ७५.६ टक्के कुटुंबात सायकल असल्याचे ‘एनएफएचएस-५’च्या २०१९-२१ च्या अहवालात नमूद केले आहे. ‘साबूज साथी’ या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पश्‍चिम बंगालने या सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान मिळविले आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली जाते. राज्यात सायकलींची संख्या वाढण्याचे हे एक मुख्य कारण आहे. ही योजना केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही लाभदायी ठरत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बंगालमध्ये सायकल

  • अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या भागांना प्राधान्य

  • पर्यावरण पूरक असल्याने शहरी भागातही वापर

  • कोलकतामधील सॉल्ट लेक आणि न्यू टाउनमध्ये रस्त्यांवर स्वतंत्र सायकल मार्गिका

  • राज्यातील अन्य शहरांमध्येही अशा मार्गिका तयार करण्याचा राज्य सरकारचा विचार

  • ‘साबूज साथी’अंतर्गत ११ मे पर्यंत एक कोटी तीन लाख ९७ हजार ४४४ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

१९-२१ मधील राज्यनिहाय सायकलींचे प्रमाण (टक्केवारीत)

  • ७८.९ - पश्‍चिम बंगाल

  • ७५.६ - उत्तर प्रदेश

  • ७२.५ - ओडिशा

  • ७०.८ - छत्तीसगड

  • ७०.३ - आसाम

  • ६७.८ - पंजाब

  • ६६.३ - झारखंड

  • ६४.८ - बिहार

  • २९.९ - गुजरात

  • २७.२ - दिल्ली

  • ५.९ - सिक्कीम

  • ५.५ - नागालँड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com