भाजप नेत्याला घातला चपलांचा हार

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

धार (मध्यप्रदेश)- आपल्या परिसरातील पाण्याचा प्रश्न न सुटल्याने एका त्रस्त नागरिकाने मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारमधील एका नेत्याला चपलांचा हार घातल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

धार (मध्यप्रदेश)- आपल्या परिसरातील पाण्याचा प्रश्न न सुटल्याने एका त्रस्त नागरिकाने मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारमधील एका नेत्याला चपलांचा हार घातल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

धार जिल्ह्यामधील धामनोद नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिनेश शर्मा अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. रविवारी सकाळी दिनेश शर्मा आपल्या समर्थकांसह ढोल-ताशांच्या गजरात प्रत्येक घरी जाऊन मत देण्याची मागणी करत होते. दरम्यान भाजप उमेदवार शर्मा एका घराबाहेर उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकाजवळ येताच  आणि मत देण्याची मागणी करताच, या नागरिकाने  शर्मा यांना चपलांचा हार घातला. चपलांचा हार घातलेल्या ज्येष्ठ नागरिकांने शर्मा यांच्यावर शाब्दिक हल्लाही केला.

अध्यक्षपदाच्या उमेदवाराला चपलांचा हार घातल्याने त्यांचे समर्थकही आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर एका समर्थकांने जवळ येत नेत्याच्या गळ्यातील चपलाचा हार काढला. 

Web Title: ngry locals greet BJP candidate with garland of shoes in Dhar Dhamnod, Madhya Pradesh