यमुना नदीत मलविसर्जन करणाऱ्यास पाच हजारांचा दंड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

यमुना नदीचे पात्र स्वच्छ राहण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कडक पावले उचलली असून नदीच्या पात्रात मलविसर्जन करणाऱ्यास पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे.

नवी दिल्ली : यमुना नदीचे पात्र स्वच्छ राहण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कडक पावले उचलली असून नदीच्या पात्रात मलविसर्जन करणाऱ्यास पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे.

यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रीय हरित लवादाने आज (शुक्रवार) दिल्ली सरकारला सूचना केल्या. यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देशनही एनजीटीने दिले. त्या समितीमध्ये दिल्ली जल बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दिल्ली डेव्हलपमेंट ऍथोरिटीचे मुख्य अभियंता आणि नॅशनल मिशन ऑफ क्‍लिन गंगा यांचा समावेश करावा, अशा सूचनाही एनजीटीने केल्या.

याशिवाय दिल्लीतील निवासी परिसरातील उद्योग (Industry) बंद करण्याचे निर्देशही एनजीटीने पुन्हा एकदा दिल्ली सरकारला दिले. यापूर्वीही दिल्ली सरकारने असे निर्देश दिले होते. 'निवासी परिसरात इंड्रस्ट्रीज अद्यापही सुरू आहेत. अशा सर्व इंडस्ट्रिज तातडीने बंद कराव्यात', असे निर्देश एनजीटीने दिले.

Web Title: NGT imposes Rs. 5k fine for open defecation on Yamuna floodplain