राष्ट्रीय तपास यंत्रणेने 3 बांग्लादेशी दहशतवाद्यांना घेतले ताब्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संघटनेच्या मोहम्मद जहिद्दुल इस्लाम उर्फ मुन्ना याला सोमवारी (ता. 6) बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. बिहार येथील बोधगया व ऑक्टोबर 2014 मध्ये पश्चिम बंगालमधील बुर्दवन येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुन्ना हा मास्टरमाईंड आहे.

कोझीकोड : राष्ट्रीय तपास यंत्रणेने जमात-उल-मुझाहिद्दीन बांग्लादेश या बोधगया बॉम्बस्फोटात संशयित असलेल्या संघटनेचा पर्दाफाश केला आहे. जानेवारी 2018 मध्ये बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटात जमात-उल-मुझाहिद्दीन बांग्लादेश ही संघटना मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संघटनेच्या मोहम्मद जहिद्दुल इस्लाम उर्फ मुन्ना याला सोमवारी (ता. 6) बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. बिहार येथील बोधगया व ऑक्टोबर 2014 मध्ये पश्चिम बंगालमधील बुर्दवन येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुन्ना हा मास्टरमाईंड आहे. त्याच्यासोबतच कोलकात्यातील मल्लपूरम् जिल्ह्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले.    

अब्दुल करीम उर्फ छोटा (वय 19), मुस्तफीजूर रहमान उर्फ शाहीन (वय 37) यांना 3 ऑगस्टला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बॉम्बस्फोटासंबंधी काही आक्षेपार्ह सामानही ताब्यात घेण्यात आला. 

Web Title: NIA arrest 3 bangladeshi terrorist