कोरेगाव भीमा प्रकरणः 83 वर्षीय फादर स्टॅन स्वामींना अटक, NIA ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी स्टॅन स्वामी यांची दोन तास चौकशी करण्यात आली होती. त्यांना चौकशीसाठी मुंबई येथील एनआयएच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते.

नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी (दि.8) अटक केली आहे. 83 वर्षीय स्टॅन स्वामी यांना चौकशीनंतर रांची येथून अटक केली. यापूर्वी स्वामी यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले होते. 

स्टॅन स्वामी यांना चौकशीसाठी गुरुवारी रांची येथील एनआयएच्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी स्टॅन स्वामी यांची दोन तास चौकशी करण्यात आली होती. त्यांना चौकशीसाठी मुंबई येथील एनआयएच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. परंतु, वयोमान आणि कोरोनाच्या संकटामुळे आपणास प्रवास करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

हेही वाचा- RBI Policy: चौथ्या तिमाहीपर्यंत देशाचा जीडीपी दर पॉझिटिव्ह होण्याची आशा

स्वामींच्या अटकेची माहिती एनआयएकडून झारखंड पोलिसांनाही देण्यात आलेली नव्हती. आज (दि.9) स्वामी यांना एनआयए न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIA arrests activist Stan Swamy in Koregaon Bhima violence case