VIdeo : कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल आणि काँग्रेस नेते माजी मंत्री एम. कृष्णप्पा यांची भाची रेवती या दोघांचा लवकरच विवाह होणार आहे. निखिल कुमारस्वामींचा रेवतीबरोबर साखरपुडा झाला आहे. निखिलने रेवती सोबतचा त्याचा फोटो फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल आणि काँग्रेस नेते माजी मंत्री एम. कृष्णप्पा यांची भाची रेवती या दोघांचा लवकरच विवाह होणार आहे. निखिल कुमारस्वामींचा रेवतीबरोबर साखरपुडा झाला आहे. निखिलने रेवती सोबतचा त्याचा फोटो फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.

Image result for nikhil kumarswamy

ताज वेस्ट एन्ड हॉटेलमध्ये हा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हे या साखरपुडयाला उपस्थित होते. निखिलचे वय ३० वर्ष असून तो अभिनेता आहे. त्याने २०१६ साली जॅग्वार या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, निखिल लवकरच नव्या चित्रटासाठी चित्रीकरण सुरु करणार आहे. निखिलने २०१९ साली मांडयामधून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत भाजपच्या सुमालता अंबरीश यांच्याकडून पराभव झाला होता.
Image result for nikhil kumarswamy
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nikhil Kumaraswamy engaged to former Cong min’s grandniece Revathi in Bengaluru