निक्की यादव हत्येप्रकरणी साहिल गेहलोतच्या वडिलांसह पाच जणांना अटक |Nikki Yadav Murder Case

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत माहिती दिली
Nikki Yadav Murder Case
Nikki Yadav Murder Caseesakal

Nikki Yadav Murder Case: दिल्लीतील निक्की यादव हत्येप्रकरणी मुख्य आरोपी साहिल गेहलोतशिवाय पोलिसांनी आणखी ५ जणांना अटक केली आहे.

गेहलोतच्या वडीलांनी देखील या प्रकरणात मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत माहिती दिली आहे.

Nikki Yadav Murder Case
ShivSena: ठाकरेंना दुहेरी धक्का? ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र

साहिल गेहलोतने त्याची लिव्ह-इन पार्टनर निक्की यादवची दिल्लीत हत्या केली होती. निक्की यादवची हत्या ज्या दिवशी करण्यात आली त्याच दिवशी संध्याकाळी साहिल गेहलोतने हरियाणातील बहादूरगड येथे जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केले.

हे प्रकरण ज्यावेळी उघडकीस आले त्यावेळी साहिलने त्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजे ९ फेब्रुवारी निक्कीची हत्या केल्याचे सांगितले जाते.

मात्र, चौकशीदरम्यान साहिलने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे.

Nikki Yadav Murder Case
Eknath Shinde : 'त्यांनी 2019मध्ये गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी सोडवून आणला' शिंदे जोरात

निक्की यादव हत्येप्रकरणी मोठा खुलासा करताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, साहिलचे कुटुंब आणि त्याचे मित्रही हत्येचा कट रचण्यात सामील होते.

गुन्हे शाखेने वडील वीरेंद्र सिंग, भाऊ आशिष आणि नवीन, मित्र लोकेश आणि अमर यांना अटक केली आहे.

निकीचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवण्यास मित्र आणि चुलत भावाने मदत केली असल्याचे सांगितलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com