
Nikki Yadav Murder Case : कशी केली निक्कीची हत्या?; चौकशीत साहिलचे धक्कादायक खुलासे
Nikki Yadav Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांडाने देश हादरलेला असतानाच राजधानी दिल्ली पुन्हा एका हत्याकांडाने हादरली आहे.
हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...
तीन दिवसांपूर्वी दिल्लीतील एका ढाब्याच्या फ्रिजरमध्ये निक्की यादव नावाच्या तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्राँचने साहिल गेहलोत नावाच्या तरूणाला अटक केली आहे.
त्यानंतर साहिलकडे करण्यात येणाऱ्या चौकशीमध्ये साहिलने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. साहिलने निक्कीची हत्या राजधानी दिल्लीतील निगमबोध स्मशानभूमीच्या पार्किंगमध्ये केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
चौकशीत साहिलने असाही दावा केला आहे की, त्याने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान निक्कीची हत्या केली होती, त्यानंतर त्याने निक्कीचा मृतदेह त्याच्या कारच्या पुढील सीटवर ठेवत मित्राव गावातील त्याच्या ढाब्यावर नेला होता.
स्मशानभूमी ते ढाब्याचे अंतर ५१ किमी
साहिल गेहलोतच्या या खुलाशामुळे दिल्ली पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण गूगलमॅपवर निगमबोध स्मशानभूमी ते मित्राव गावातील ढाबा हे अंतर जवळपास ५१ किलोमीटर दाखवले जात आहे.
साहिलने भरदिवसा राजधानी दिल्लीत कारच्या समोरच्या सीटवर मृतदेह घेऊन ५१ किमीचा प्रवास केला. यादरम्यान त्याचे वाहन कुणीच थांबवले नाही.
त्याच संध्याकाळी केलं लग्न
निक्की यादवची हत्या ज्या दिवशी करण्यात आली त्याच दिवशी संध्याकाळी साहिल गेहलोतने संध्याकाळी हरियाणातील बहादूरगड येथे जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केले. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती किंवा पश्चाताप नव्हता.
हे प्रकरण ज्यावेळी उघडकीस आले त्यावेळी साहिलने त्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजे ९ फेब्रपवारी निक्कीची हत्या केल्याचे मानले जात होते. मात्र, चौकशीदरम्यान साहिलने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळन लागले आहे.