लग्न सुरु असतानाच स्टेज कोसळल्याने 9 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

विवाह विधी सुरु असतानाच घटनास्थळी उभारण्यात आलेले स्टेज अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून नऊ जण मृत्युमुखी पडले. पीडितांना तत्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले

जयपूर - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये एका लग्नामध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये नऊ नागरिक मृत्युमुखी पडले. काल (शुक्रवार) रात्री घडलेल्या या दुर्घटनेमध्ये अन्य 15 जण जखमी झाले.

येथील पिढी गावामध्ये विवाह विधी सुरु असतानाच घटनास्थळी उभारण्यात आलेले स्टेज अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून नऊ जण मृत्युमुखी पडले. पीडितांना तत्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काही नागरिकांचे प्राणोत्क्रमण झाले. दरम्यान, इतर जखमींना उपचारार्थ जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Nine killed as structure collapses during wedding rituals in Rajasthan