निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नऊ नवे पक्ष

निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नऊ नवे पक्ष
निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नऊ नवे पक्ष

नाशिक - निवडणूका आल्या की पक्षांतराचा हंगाम सुुर होतो. सध्या मात्र विचारसरणी, ध्येय, धोरण सगळेच केवळ निवडणूका जिंकणे आणि राजकीय तडजोडीवर भर दिला जात असल्याने महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावरच राज्यात गेल्या आठवड्यात राष्ट्रीय मराठा पार्टीसह नऊ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. यातील बहुतांशी पक्ष व त्यांचे नेते राजकीयदृष्ट्या फारसे परिचित नसल्याने त्यांचा राज्याच्या अथवा स्थानिक राजकारणावरही कितपत प्रभाव पडेल हे अनिश्‍चित आहे.

नुकत्याच नोंदणी झालेल्या पक्षात नाशिकच्या भारतीय वडार समाज संघर्ष पार्टीसह मोहन जगताप मित्र मंडळ आघाडी (बीड), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (मुंबई), राष्ट्रीय मराठा पार्टी (लातूर), सेवा साम्राज्य पार्टी (परभणी), सांगोला शहर विकास महायुती (सोलापूर), मराठवाडा मुक्ती मोर्चा (जालना), भिमा परिसर विकास आघाडी पक्ष (सोलापूर) आणि युनायटेड कॉंग्रेस पार्टी (मुंबई) यांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव रीना फणसेकर यांनी याविषयीचे परिपत्रक काढले आहे.

राज्यात गेल्या महिन्यात 357 राजकीय पक्ष होते. यातील हिशेब व अन्य प्रशासकीय पूर्ततांअभावी यातील 231 पक्षांची नोंदणी आयोगाने रद्द केली होती. त्यानंतर सव्वीस नव्या पक्षांची नोंदणी झाली होती. त्यात आता गेल्या आठवड्यातील सात पक्षांची भर पडल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या दप्तरी 159 राजकीय पक्ष आहेत.

सध्या उत्तर महाराष्ट्रात तीस राजकीय पक्ष असून त्यांची नावे अशी :

नाशिक : स्वावलंबी पक्ष, जनराज्य आघाडी
नगर : संभाजी ब्रिगेड, जगदंबा विकास आघाडी, जनशक्ती विकास आघाडी (शेवगाव), जन विकास आघाडी (कोपरगाव), लोकसेवा आघाडी (कोपरगाव)
जळगाव : खानदेश विकास आघाडी (जळगाव), शहर विकास आघाडी (चोपडा), गर्जना लोकराज्य चळवळ (महाराष्ट्र), जनक्रांती आघाडी, धरणगाव शहर विकास आघाडी, अंमळनेर तालुका शहर विकास आघाडी, मा. लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, शहर विकास आघाडी (पारोळा), जयहींद नवनिर्माण सेना (अंमळनेर), जनआधार विकास पार्टी, मुव्हमेंट फॉर इंडियन मुस्लीम आघाडी (भुसावळ), आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार (आघाडी), जय मातृभूमी पक्ष, शहर विकास पक्ष, भुसावळ शहर विकास आघाडी
नंदुरबार : जिल्हा विकास आघाडी, शहर विकास मंच (शहादा), पी. के. आण्णा पाटील लोकशाही आघाडी, धुळे : विश्व इंडियन पार्टी- व्ही.आय.पी. (धुळे), मानव एकता पार्टी (धुळे), लोकसंग्राम पक्ष (धुळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com