वाहन चालवताना 10 पैकी 9 जण करतात मोबाईलचा वापर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नवी दिल्ली- वाहन चालविताना 10 पैकी 9 जण मोबाईलचा वापर करतात, अशी माहिती एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आली आहे.

सेव्हलाईफ फाऊंडेशनने आठ शहरांमध्ये सर्वेक्षण केले असून, अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, जयपूर व बंगळूरसारख्या शहरांचा समावेश आहे.

वाहन चालवत असताना 94 टक्के चालक हे मोबाईलचा वापर करतात. यापैकी 47 टक्के हे आलेले फोन घेतात. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे धोकादायक आहे. अनेकदा वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर केल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सर्वेक्षणातूनही ही माहिती पुढे आली आहे. एवढे असतानाही अनेकजण धोका स्वीकारून मोबाईलवर बोलताना दिसतात.

देशभरात सध्या मोबाईलवर बोलत असताना झालेला अपघात हे सर्वांत मोठे कारण आहे. अशा अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

Web Title: Nine out of 10 people feel using mobile phone while driving is dangerous