देवदर्शनाहून परतताना एकाच कुटुंबातील 9 जणांवर काळाचा घाला; 3 जखमी

Nine People of a Family Killed 3 Injured as SUV Rams
Nine People of a Family Killed 3 Injured as SUV Rams

रायपूर- छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे आज (ता. 14) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कुंटुबाच्या राजनंदगाव येथे मोटारीला अपघात झाला. हे सर्वजण डोंगरगड येथून भिलाईला परत निघाले होते.

भिलाई येथून एसयूव्ही मोटारीने परतत असताना दुसऱ्या मोटारीला ओव्हरटेक करत असताना समोर येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली आहे. या मोटारीत असलेल्या 9 प्रवाशांचा जाग्यावरच मृ्त्यू झाला आहे. त्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तेथे त्यांना मृत घोषित केले. मृत 9 जण एकाच कुटुंबातील असून ते नवरात्री उत्सवानिमित्त बामलेश्वरी देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला आहे. 

या अपघातात ट्रकमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तेथिल स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com