दिल्लीतील सराफांचा बंद नवव्या दिवशी सुरूच

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील सराफांचा बंद शनिवारी नवव्या दिवशीही सुरूच राहिला. प्राप्तिकर विभागाने नफेखोरी आणि कर चुकवेगिरीप्रकरणी सराफी पेढ्यांवर छापे टाकल्यामुळे 11 नोव्हेंबरपासून हा बंद पुकारण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात सरकारने पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते. यानंतर प्राप्तिकर विभागाने दिल्लीतील दरीबा कालन, चांदणी चौकी आणि करोल बाग येथे सराफी पेढ्यांवर छापे टाकले होते. यामुळे सराफांनी 11 नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालयाने सराफांना नोटिसा पाठविल्या असून, त्यांच्याकडे सोने विक्रीचे तपशील मागितले आहेत. तसेच सोन्याचा साठा आणि मागील काही दिवसांत केलेली विक्री याची माहितीही सराफांकडे मागितली आहे.

Web Title: On the ninth day jewellers shut in Delhi