केरळात 'निपाह'वर उपचार करणाऱ्या परिचारिकांवर बहिष्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

कोझिकोडे : केरळमध्ये 'निपाह' विषाणूची लागण होऊन आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक जण दगावले आहेत. या गंभीर विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांनाच येथील समाजाने बहिष्कृत केले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पेरांबरा तालुक्यातील रुग्णालयातील परिचारिका घरी जाण्यासाठी बसमध्ये शिरल्या होत्या. निपाहचा रोग झालेल्या रुग्णांवर उपचार करताना परिचारिकांनाही याची लागण झाली असेल आणि त्यांच्यामुळे आम्हालाही निपाहची लागण होऊ शकते, या भीतीपोटी बसमधील काही प्रवाशांनी या परिचारिकांना बसमध्ये चढण्यास तीव्र विरोध केला. तसेच परिचारिका बसमध्ये शिरल्या तर आम्ही बसमधून उतरू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती.

याशिवाय दुसरीकडे परिचारिकांना रिक्षातून घेऊन जाण्यास रिक्षाचालकांमध्ये सुद्धा प्रचंड भीती असून, रिक्षाचालकही परिचारिकांना रिक्षात बसू देण्यास टाळाटाळ करीत आहेत. इतकेच नाहीतर 'निपाह'ची लागण होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तींवर दफनभूमीत दफन करण्यासही टाळाटाळ करीत आहेत.

Web Title: Nipah Virus Reaction People Nurses Being Ostracized by peoples In Kerala

टॅग्स