निपाणी पालिकेत ३१ जागांसाठी १५९ अर्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

निपाणी - येथील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी (ता. १८) अखेरच्या दिवशी ९२ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून म्हणजे १० ऑगस्टपासून आजपर्यंत शहरातील ३१ प्रभागांतून तब्बल १५९ अर्ज दाखल झाले आहेत.

निपाणी - येथील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी (ता. १८) अखेरच्या दिवशी ९२ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून म्हणजे १० ऑगस्टपासून आजपर्यंत शहरातील ३१ प्रभागांतून तब्बल १५९ अर्ज दाखल झाले आहेत. आता सोमवारी (ता. २०) छाननीनंतर गुरुवारी (ता. २३) अर्ज माघारीची मुदत असल्याने रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र यादिवशी स्पष्ट होणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात सर्वात मोठी असणाऱ्या निपाणी पालिका निवडणुकीच्या हालचालीकडे भागाचे लक्ष आहे. निवडणुकीत ३१ जागा निवडायच्या असल्याने प्रारंभीपासून येथे मोठ्या संख्येने अर्ज येतील, असे वाटले होते. पण अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी व आज (ता. १८) अखेरच्या दिवशी येथे उमेदवारी अर्जांची गर्दी दिसली. अखेरचा दिवस असल्याने भाजप, काँग्रेस पुरस्कृतसह सर्वच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सकाळपासून पालिका आवारात इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी होती. दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयात दाखल झालेल्या इच्छुकांचेच अर्ज स्वीकारण्यात आले.

Web Title: Nipani corporation election