नीरव मोदी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याच्या माहितीला भारत आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

फायनांशिअल टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार, भारतातील अब्जाधीश, हिरे व्यवसायिक व 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक घोटाळा करणारा नीरव मोदी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे. नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याच्या माहितीला भारत आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

ब्रिटनच्या गृहमंत्रालयाशी संपर्क साधला, तेव्हा एखाद्या वैयक्तिक प्रकरणांवर माहिती देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. रॉयटर्सने ब्रिटनच्या गृहमंत्रालयाशी संपर्क साधला होता. भारतीय तपास यंत्रणा नीरव मोदीच्या शोधात आहेत. 

पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणण्यानुसार, 2018 च्या आधी निरव मोदी आणि त्यांचे काका मेहुल चोक्सी या दोघांच्या कंपन्यांनी मुंबई येथील पीएनबी शाखेच्या नकली कर्मचाऱ्यांकडून अवैध रक्कम वापरुन भारतीय बँकांच्या विदेशी शाखांतील पैशांचा घोटाळा केला होता. मोदी व त्याच्या संबंधित घोटाळ्यांचा आकडा हा सुमारे 2.2 अब्ज डॉलर्स इतका आहे.

अहवालानुसार, राजकीय छळ झाल्याचा आरोप करत नीरव मोदीने ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने फायनांशिअल टाइम्सला सांगितले की, भारत सरकार कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या प्रतीक्षेत आहे की त्यांनी मोदीला देशाच्या स्वाधीन करावे. भारतातून आधीच मद्य व्यावसायिक व उद्योगपती विजय मल्ल्या गेल्या वर्षी मार्चमध्ये ब्रिटनला स्थायिक झाले होते. त्यांच्या फॉर्म्यूला वन फोर्स इंडिया कंपनीवर कर्ज होते. विजय मल्ल्या देखील कर्ज बुडवून ब्रिटनला पळून गेला होता. 

केंद्रीय अन्वेषण विभागाने मे मध्ये 25 पेक्षा जास्त जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये मोदी, चोक्सी, पीएनबीचे माजी अध्यक्ष उषा अनंत सुब्रमण्यम, बँकेच्या दोन कार्यकारी संचालक आणि नीरव मोदी यांच्या तीन कंपन्या होत्या. मोदी आणि चोक्सी यांनी त्यांनी केलेल्या सर्व चुकीच्या गोष्टी नाकारल्या आहेत. गेल्या महिन्यात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीबीआयद्वारे आरोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात 2016 च्या अखेरीस बँकेने वित्तीय संदेश यंत्रणा हाताळणी करण्यावर आणि मध्यवर्ती भागात असलेल्या क्रेडिट गॅरंटीवर राज्य सरकारची फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Nirav Modi in Political Asylum In UK