लंडन न्यायालयाचा नीरव मोदीला दणका; जामीन देण्यास नकार

 लंडन न्यायालयाचा नीरव मोदीला दणका; जामीन देण्यास नकार

लंडन: पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवून ब्रिटनमध्ये राहत असलेल्या नीरव मोदीला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत आहे. पण शुक्रवारी झालेल्या सुनावणीत लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला. आता याच्या पुढची सुनावणी 24 मेला होणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला 20 मार्चला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याच दिवशी न्यायालयात हजर केले गेले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अटक झाल्यानंतर नीरव मोदीची रवानगी लंडनच्या वँड्सवर्थ कारागृहात करण्यात आली आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com