‘निर्भय’हवेत सोडल्यानंतर आठ मिनिटांत चाचणी रद्द;क्षेपणास्त्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट 

‘निर्भय’हवेत सोडल्यानंतर आठ मिनिटांत चाचणी रद्द;क्षेपणास्त्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट 

भुवनेश्‍वर  - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ने सोमवारी सकाळी ओडिशाच्या चाचणी तळावरून बंगालच्या उपसागरात सोमवारी ८०० किलोमीटर क्षमतेचे निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र सोडण्यात आले, पण त्यानंतर काही वेळातच ही चाचणी रद्द करण्यात आली. 

‘‘आज सकाळी साडेदहाच्या दरम्यान ‘निर्भय’ क्षेपणास्त्र सोडण्यात आले, पण आठ मिनिटांनंतर क्षेपणास्त्रात तांत्रिक बिघाड उद्‍भवल्याने चाचणी रद्द करण्यात आली,’’ असे अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. ‘गेल्या ३५ दिवसांत ‘डिआरडीओ’ने चाचणीसाठी सोडलेल्या क्षेपणास्त्रांत ‘निर्भय’ हे दहावे क्षेपणास्त्र आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनने केलेली सैन्याची जमवाजमव आणि क्षेपणास्त्र तैनातीच्या पार्श्वभूमीवर नव्या युगातील क्षेपणास्त्र विकासाच्या आणि तैनातीच्या कार्यक्रमाला गती दिली आहे. त्यामुळेच डीआरडीओकडून सरासरी दर चार दिवसांनी क्षेपणास्त्र चाचणी सुरू आहे. 

या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, पुढच्या काही महिन्यांत ‘डीआरडीओ’ पुन्हा चाचणी करणार आहे. त्यानुसार भारतीय लष्करात क्षेपणास्त्राच्या समावेशाचा मार्ग मोकळा होईल. निर्भय क्षेपणास्त्राची आठव्या फेरीची चाचणी करण्याआधी मर्यादित प्रमाणत ही क्षेपणास्त्रे चीनला लागून असलेल्या सीमेवर पाठवण्यात आली आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहे निर्भय क्षेपणास्त्र 
आवाजाच्या वेगापेक्षा कमी वेगाने जाणारे (सबसॉनिक) क्षेपणास्त्र 
वेग प्रतितास ०.७ मॅक (८६४.३६ किलोमीटर) एवढा आहे. 
जमिनीपासून १०० मीटर ते चार किलोमीटर अंतरावरून उड्डाण करून लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता. 
सागरी पृष्‍ठभाग व जमिनीला स्पर्श करून हवेत झेप घेण्याच्या क्षमतेमुळे शत्रूच्या नजरेपासून दूर राहू शकते. 
३०० किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com