निर्भयाच्या आरोपींची फाशी ‘आप’मुळे रखडली - प्रकाश जावडेकर

prakash javadekar
prakash javadekar

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशी केजरीवाल सरकारमुळे रखडली, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला.

राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान आप आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक झाली. आप खासदार संजयसिंह यांनी निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीला होणाऱ्या विलंबाबद्दल केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरताना आरोपींना फाशी देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. प्रत्युत्तरादाखल जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावरच ठपका ठेवला.

जावडेकर म्हणाले की, निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्येच फेटाळून लावली. परंतु, कारागृह प्रशासनाने निकाल कळविण्यासाठी वर्षभराचा कालावधी घेतला आणि हा विलंब राज्य सरकारमुळे झाला, अशा आरोप जावडेकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com