निर्भया प्रकरणातील आरोपींना स्वतंत्र सेलमध्ये हलविले

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली: दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील दोन आरोपींना तिहार तुरुंगाच्या स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती तुरुंगाधिकाऱ्यांनी आज दिल्ली न्यायालयाला दिली.

या प्रकरणातील आरोपी पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंग यांनी तुरुंगातील अन्य कैदी आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास देतात, अशी तक्रार करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी दोघांना अन्य कैद्यांबरोबर सामान्य सेलमध्ये ठेवण्यात आले होते.

विशेष न्यायाधीश संजीव अगरवाल यांनी उपअधीक्षक संजीव गुप्ता यांना या कैद्यांना 11 जानेवारीपर्यंत स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्यास सांगितले होते. या परिस्थितीत दोन्ही आरोपींचे म्हणणे ऐकून त्यांच्या वकिलांनी समाधान व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाचा निपटारा केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या दोन्ही आरोपींच्यावतीने वकील ए. पी. सिंग यांनी याचिका दाखल केली होती. अन्य कैद्यांपासून या दोघांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले होते.

Web Title: nirbhaya case: accused moved to separate cell