Nirbhaya Case:दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

टीम ई-सकाळ
सोमवार, 2 मार्च 2020

Image may contain: text

Image may contain: text

नवी दिल्ली New Delhi : निर्भया सामूहिक बलात्कार Nirbhaya Case प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. या संदर्भात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल झाली होती. कोर्टाच्या या निर्णयामुळं चारही दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोषींविरोधात जारी करण्यात आलेल्या डेथ वॉरंटनुसार उद्या (3 मार्च) चौघांनाही फाशी देण्यात येणार आहे. मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवनकुमार गुप्ता या चौघांना उद्या फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

निर्भया खटल्यातील दोषी पवनकुमार गुप्ता याने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती. आज, सकाळी त्यावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी ही याचिका फेटाळून लावली. पवनकुमारने शुक्रावारी 28 फेब्रुवारी सुप्रीम कोर्टा याचिका दाखव केली होती. त्यात त्याने त्याला देण्यात आलेल्या फाशीला जन्मठेपेमध्ये रुपांतरीत करावे, अशी मागणी केली होती. पवनकुमारच्या याचिकेमुळं चौघांच्याही फाशीला स्थगिती मिळाली असती. परंतु, सुप्रीम कोर्टात न्यायधीश रमण्णा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने त्याची याचिका फेटाळली. 

'PMOतील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'

काय घडले होते 16 डिसेंबरला?
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी 23 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. संबंधित तरुणीवर सिंगापूरमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या प्रकरणात विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह यांच्यासह अल्पवयीन मुलगा दोषी ठरला. त्याला तीन वर्षांच्या शिक्षेनंतर सोडून देण्यात आले. तर इतर चौघांविरुद्ध खटला चालवण्यात आला. त्यात चौघा दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर चौघांनीही वेगवेगळ्या कायदेशीर मार्गांनी फाशी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. आता दिल्ली कोर्टाने त्या चौघांविरुद्ध फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट जारी केले आहे. सुप्रीम कोर्टानेही या फाशीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आज पटियाला हाऊस कोर्टानंही तसाच निर्णय दिल्यामुळं उद्या या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirbhaya case convicts patiyala house court rejects appeal to stop death sentence