Nirbhaya Case : 'निर्भया'तील सर्वच दोषींची फाशी कायम; एक फेब्रुवारीला शिक्षा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मुकेश सिंगची याचिका फेटाळली

- 22 जानेवारीला देणार होते फाशी

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. यातील दोषींविरोधात न्यायालयाकडून 'डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार एक फेब्रुवारीला फाशी दिली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर, 2012 मध्ये निर्भया बलात्कार प्रकरण घडले होते. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यातील दोषींना न्यायालयाकडून फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. यातील दोषींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. मात्र, आता राष्ट्रपतींनी त्यांची दया याचिका फेटाळली आहे. त्यानंतर आता न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. या वॉरंटप्रमाणे एक फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता दोषींना फाशी दिली जाणार आहे.

मुकेश सिंगची याचिका फेटाळली

दोषी मुकेश सिंग याची दया याचिका केंद्रीय गृहमंत्रालायकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र, ही दया याचिका राष्ट्रपतींनी तात्काळ फेटाळली.

NDTV Photo

22 जानेवारीला देणार होते फाशी

यापूर्वी 22 जानेवारीला फाशी दिली जाणार होती. मात्र, दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या कारणास्तव फाशी देता आली नाही. त्यानंतर यातील दोषींनी लगेचच राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. ती फेटाळल्याने दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Image result for hang


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Case A Delhi Court Issues Death Warrant For Convicts For 1st February