निर्भया प्रकरण; आरोपींना त्वरित फाशीची याचिका फेटाळली

पीटीआय
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. "तुम्ही कशा प्रकारची प्रार्थना करीत आहात? न्यायालयाची तुम्ही थट्टा करीत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 
न्यायाधीश मदन बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठात या याचिकेवर आज सुनावणी झाली.

पॅरामेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थिनीवर सहा जणांनी दक्षिण दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. तिला बसमधून बाहेर फेकण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार केले. प्रकृती खालावल्याने सिंगापूरमधील रुग्णालयात तिचे 29 डिसेंबर 2012 मध्ये निधन झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. दोषींना शिक्षा देऊन निर्भयाला न्याय देण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते.

दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर फेरविचार करावा, अशी आरोपी मुकेश (वय 31), पवन गुप्ता (वय 24) व विनय शर्मा (वय 25) यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने 9 जुलै रोजी फेटाळली होती. यातील चौथा आरोपी अक्षय कुमार (वय 33) याने फेरविचार याचिका केली नव्हती. त्यालाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

Web Title: Nirbhaya Case to quick punishments to Accused petition was rejected