'निर्भया' बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा...

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

राष्ट्रपतींकडून अर्ज फेटाळला

- जल्लादला मिळणार 60 हजार रुपये

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. यातील दोषींना फाशीची शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. मात्र, त्यांची ही शिक्षा आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणातील दोषींना 22 जानेवारीला फाशी देणं शक्य नाही, असे दिल्ली सरकारने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर, 2012 मध्ये निर्भया बलात्कार प्रकरण घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर देशात संताप व्यक्त केला जात होता. सबळ पुराव्यांमुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींवरचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यानुसार आता त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार येत्या 22 जानेवारीला शिक्षा दिली जाणार होती. मात्र, 22 जानेवारीला फाशी देणं शक्य नाही, असे दिल्ली सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आता त्यांची फाशीची शिक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

Image result for Hang

राष्ट्रपतींकडून अर्ज फेटाळला

फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून दोषींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते. यापूर्वी राष्ट्रपतींनी काही याचिका फेटाळल्या होत्या.

जल्लादला मिळणार 60 हजार रुपये

या प्रकरणातील दोषींना फाशी देणाऱ्या पवन या जल्लादला एका दोषीला फाशी देण्याचे 15 हजार रुपये मिळतात. त्यानुसार चारही दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादला तब्बल 60 हजार रुपये मिळणार आहेत.

Courtesy : Jagran.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Convicts Hanging Wont Take Place On 22 January Delhi Government Tells High Court