'निर्भयाच्या फोटोला मिठी मारली अन् सांगितले...'; आईने व्यक्त केली भावना

वृत्तसंस्था
Friday, 20 March 2020

फाशीनंतर निर्भयाची आई आशादेवी यांनी माध्यमांशी बोलताना निर्भयाला आज अखेर न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीत २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना आज फाशीची शिक्षा झाली. पहाटे साडेपाच वाजता या चौघांना फासावर चढविण्यात आले. त्यामुळे २०१२ पासून न्याय मिळवण्यासाठी सुरू झालेला झगडा अखेर आज २०२० मध्ये संपुष्टात आला. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी तिचे आई-वडिल दिवसंरात्र प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले असून, निर्भयाला आज न्याय मिळाला. फाशीनंतर निर्भयाची आई आशादेवी यांनी माध्यमांशी बोलताना निर्भयाला आज अखेर न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

निर्भयाची आई, आशादेवी यांनी चार दोषींच्या फाशीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 'आज भारतातील प्रत्येक मुलगी स्वतःला सुरक्षित समजेल. प्रत्येक आई-वडिलांना आता आपल्या मुलांना समजवायला हवे की, असे केल्यास तुम्हालाही फाशी होईल. जसा सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिल्याचे घोषित केले, त्यानंतर मी माझ्या मुलीच्या फोटोसमोर गेले, तिला हात जोडले, तिच्या फोटोला मिठी मारली आणि सांगितले की, बेटा आज तुला न्याय मिळाला आहे.' अशा शब्दांत निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच बोलताना त्यांनी निर्भयाची बहिण सुनिता देवी व वकिल सीमा खुशवाह यांना जवळ घेऊन समाधान व्यक्त केले.  

निर्भयाला न्याय : चारही दोषींना अखेर फासावर लटकवलं!

निर्भया खटला : दोषींनी अशा शोधल्या कायद्याच्या पळवाटा; चार वेळा निघाले डेथ वॉरंट

निर्भयाला वाचवू शकले नाही, याचं मला आजही वाईट वाटतं. न्याय मिळण्यास उशीर झाला, मात्र तिला न्याय मिळाल्याने आज मी समाधानी आहे. आज फक्त निर्भयाचा नाहीच, तर तिच्या न्यायासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा विजय झाला आहे, असेही तिच्या आईने सांगितले. तर व्हिक्टरीची साईन दाखवून त्यांनी निर्भयाला मिळालेल्या न्यायावर सामाधान व्यक्त केले. 

निर्भयाचे वडिल बद्रिनाथ यांनी सांगितले की आज अखेर निर्भयाला न्याय मिळाला आणि आमचा विजय झाला, हा विजय मीडिया, समाज व दिल्ली पोलिसांचा आहे. तुम्ही समजू शकता की आता मी मनापासून समाधानी व हासत आहे. 

काय घडलं होतं?
16 डिसेंबर 2012 रोजी नवी दिल्लीतील रस्त्यांवर चालत्या गाडीमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पॅरा मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी असलेली तरुणी आपल्या मित्रासोबत सिनेमा पाहून होस्टेलवर परतत असताना सहा नराधमांची तिच्यावर वाकडी नजर पडली होती. खासगी मिनी बसमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपींनी संबंधित तरुणी आणि मित्राला गाडीत घेतलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Mother Asha Devi reaction after criminals hanged