
सितारामन या पहिल्या महिला पूर्णवेळ केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प जाहीर करतील. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज सादर करतील. सितारामन या पहिल्या महिला पूर्णवेळ केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प जाहीर करतील. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
तब्बल 49 वर्षानंतर एक महिला अर्थसंकल्प सादर करतील. इंदिरा गाधी यांनी अरथसंकल्प सादर केला असला, तरी त्या पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. पंतप्रधान पदासोबतच अर्थमंत्री पदही इंदिरा गांधी यांनी स्वतःकडे ठेवले होते. 28 फेब्रुवारी 1970 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
निर्मला सीतारामन यापूर्वी संर7ण मंत्रीपदाचा कारभारही सांभाळला होता. त्या पहिल्या महिला संरक्षण मंत्रीही होत्या. 2008 मध्ये त्यांनी राजकारणत प्रवेश केला व भाजपच्या प्रवक्त्या म्हणून काम बघितले. त्यानंतर 2014 मध्य़े त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली व त्यानंतर 3 डिसेंबर 2017 ला कॅबिनेटच्या फेरबदलात संरक्षण मंत्री झाल्या.