भारताचे "ऍक्‍ट ईस्ट' धोरण आकार घेत आहे...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जानेवारी 2018

लुक ईस्ट' धोरणाचे रुपांतर "ऍक्‍ट ईस्ट' धोरणात व्हावे, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनंतर या धोरणाला आता आकार येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर आसियान गटातील दहा देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत

नवी दिल्ली - भारताचे "ऍक्‍ट ईस्ट' धोरण आता आकार घेत असून प्रजासत्ताक दिनाला आसियान देशांचे नेते उपस्थित राहिल्यानंतर या धोरणाचे प्रत्यक्षरुप दिसेल, असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (सोमवार) सांगितले.

दिल्लीतील एनसीसीच्या छावणीला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "लुक ईस्ट' धोरणाचे रुपांतर "ऍक्‍ट ईस्ट' धोरणात व्हावे, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनंतर या धोरणाला आता आकार येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर आसियान गटातील दहा देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांची ही उपस्थिती म्हणजेच या धोरणाचे प्रत्यक्ष रुप असेल,' असे सीतारामन यांनी सांगितले.

Web Title: nirmala sitharaman act east india asian