संरक्षणमंत्री जेव्हा कर्नाटकच्या मंत्र्यावर भडकतात

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

कर्नाटकमधील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांवरच भर बैठकीत आपला राग व्यक्त केला.

कोडागु : कर्नाटकमधील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांवरच भर बैठकीत आपला राग व्यक्त केला.

निर्मला सितारामन या कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील पूरपरिस्थीतीची पाहणी करण्यास गेल्या असता, कर्नाटकचे मंत्री एस. आर. महेश यांच्यावर भडकल्या. घटनास्थळी पाहणी करून झाल्यानंतर माध्यमांशी व अधिकाऱ्यांशी बोलताना दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सर्व माध्यम प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमोर रंगला. सितारामन पूर प्रभावित नागरिकांशी बोलत असताना महेश त्याठिकाणी आले त्यांनी सितारामन यांना सांगितले की अधिकारी तुमची वाट पाहत आहेत, त्यांना पुनर्वसनासाठी जायचे आहे. प्रथम अधिकाऱ्यांशी बोलावे असे त्यांचे म्हणणे होते. यावर त्या मंत्र्यावर भडकल्या.

सितारामन म्हणाल्या, की मला महेश यांच्यासोबत त्यांच्या नियोजनानुसार प्रवास करावा लागला. एका राज्यातील मंत्र्यामागे, केंद्रीय मंत्र्याने फिरणे हे मला पटले नाही. माझ्या प्रत्येक मिनिटाचा कार्यक्रम त्यांच्याकडे असताना ते त्यांच्या म्हणण्यानुसारच काम करत होते.

Web Title: nirmala sitharaman angry on karnataka state minister