अर्थसंकल्पावरून सीतारामन यांचे चिदंबरम यांना जोरदार प्रत्युत्तर

अर्थसंकल्पावरून सीतारामन यांचे चिदंबरम यांना जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली - भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रूपयांपर्यंत वाढणे ही, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या मते जर स्वाभाविकपणे घडणारी प्रक्रिया असेल तर कांग्रेसने 60 वर्षे राज्य करून नेमके केले तरी काय, असा भेदक प्रतिप्रश्न विचारून केंद्रीय अर्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काॅंग्रेसच्या अर्थसंकल्पीय टीकेला आक्रमकपणे उत्तर दिले. 

चिदंबरम यांनी सोयीची तेवढी आकडेवारी मांडताना प्राप्तीकर संकलनाची एकत्रित गणना व अर्थसंकल्पाच्या रचनेतील तत्सम मुलभूत गोष्टी दडवून ठेवल्याचाही आक्षेप सीतारामन यांनी नोंदविला.यूपीए काळात अर्थव्यवस्थेच्या विकासापेक्षा घोटाळ्यांवरच तुमचे लक्ष केंद्रीत झआले होते त्याला मोदी सरकार काय करणार य़ तुम्ही आम्हाला काय  वारसा ठेवला, तर न भरलेली कित्येक कोटींच्या बिलांटा डोंगर, असे त्यांनी सागताच आनंद शर्मांसह विरोधी नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. मात्र सीतारामन यांनी तब्बल दोन तास केलेल्या भाषणात मुख्यतः चिदंबरम यांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे खुलासे एेकण्यास खुद्द चिदंबरम यावेळी सभागृहातच नव्हते.

देशात 20 वर्षांत फक्त 11 रचनात्मक आथिर्क सुधारणा - स्ट्रक्चरल रिफाॅर्म्स झाल्याचा चिंदबरम यांचा दावा खोडून काढताना सीतारामन यांनी 2014 नंतर मोदी सरकारचे तब्बल 16 निर्णय हे  स्ट्रक्चरल रिफाॅर्म्स असल्याचे सांगितले. यात त्यांनी आधार, पीएम किसान सन्मान योजना, जीएसटी, एफडीआय धोरणात मुलभूत बदल, दीर्घकालीन मार्केट बाॅंडस् आदींचा उल्लेख केला.

सीतारामन म्हणाल्या की चिदंबरम हे ज्येष्ठ व श्रेष्ठही आहेत. पण त्यांनी केलेले दावे एेकून मी हतबुध्द झाले. सोयीस्करपणे आकडे मांडण्याची व दडविण्याची माजी अर्थमंत्र्यांची कला ही मलाही शिकण्यासारखी बाब ठरावी असा टोला त्यानी लगावला. शौचालयांबाबतच्या आक्षेपांना उत्तर देताना त्यानी सांगितले की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहाय्याने एका तटस्थ आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात ग्रामीण भारतातील 96.5 टक्के लोक शौचायलाचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. शिवाय स्वच्छ भारत ग्रामीण योजनेत शौचायलांना पाणीपुरवठ्यासाठी वाढीव तरतूद केलेली आहे. पाच लाख कोटींची अर्व्यव्वयस्था हे स्वप्न नाही व मोदी सरकार ते पाच वर्षांत सत्यात उतरवेल असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की प्राप्तीकर संकलनाचे उद्दिष्ट 7 वरून 24 टक्क्यांवर वाढविणे हे अवास्तव असल्याचे चिदंबरम म्हणतात पण त्यांनी फक्त प्राप्तीकर हे कसे गृहीत धरलेय़ प्राप्तीकर संकलनात कार्पोरेट टॅक्स व एसटीटी हेही त्यात गृहीत धरले जाते हे माजी अर्थमंत्र्याना मी सांगावे काय़

एक काय ते ठरवा !
सट्रक्चरल रिफाॅर्म्स  बाबत बोलताना सीतारामन यांनी जीएसटी कायद्याचा उल्लेख करताच काॅंग्रेसने, हा कायदा मुळात आम्हीच आणला व त्यावेळी तुम्ही (भाजप) त्याला विरोध केला होतात, असे म्हणून गदारोळ केला. त्यावर सीतारामन म्हणाल्या की जीएसटी तुम्हीच आणला हे मान्य पण तो यशस्वीपणे लागू आमच्या सरकारनेच केला आणि तुमचे नेते (राहूल गांधी) आजही त्याला गब्बर सिंग टॅक्स म्हणून हिणवतात. तेव्हा गब्बर सिंग टॅक्सला तुमचा पाठिंबा आहे की जीएसटीचे श्रेय तुम्हाला हवे, याचा एकदा काॅंग्रेसने निर्णय करावा. हे एकताच काॅंग्रेसच्या बााकंवर शांतता पसरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com