अर्थमंत्र्यांनी केली तब्बल 102 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा

वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

  • अर्थमंत्र्यांकडून 102 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा 

नवी दिल्ली: देशात पुढील पाच वर्षांच्या कालावधीत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील 102 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची महत्त्वाची घोषणा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्राला गती देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सांगितले होते. चार महिन्यांच्या कालावधीत या क्षेत्राशी संबंधित विविध 70 घटकांची सल्लामसलत केल्यानंतर या 102 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी एका कृती गटाची स्थापना केल्याचीही माहिती पुढे सीतारामन यांनी दिली.

बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय

याव्यतिरिक्त आणखी 3 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची आखणी होते आहे. मागील सहा वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी विविध योजनांवर 51 लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यात ही आणखी भर असणार आहे.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

आगामी काळात येऊ घातलेल्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येकी 39 टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी करणार आहे. तर उर्वरित 22 टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी खासगी क्षेत्राद्वारे होणार आहे. हे प्रकल्प वीज, रेल्वे, नागरी सिंचन, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांशी संबंधित असणार आहेत, अशी माहिती पुढे सीतारामन यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirmala Sitharaman unveils ₹102 lakh crore national infrastructure plan