नीरव मोदी प्रकरणात आरोपपत्र दाखल 

पीटीआय
मंगळवार, 15 मे 2018

चोक्‍सीचा सविस्तर उल्लेख नाही 
सीबीआयने या आरोपपत्रात मेहुल चोक्‍सी याच्या भूमिकेचा सविस्तर उल्लेख केलेला नाही. गीतांजली समूहाशी संबंधित प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करताना त्याच्यासंबंधी सविस्तर उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले. नीरव आणि चोक्‍सी यांनी यापूर्वीच देशातून पलायन केले आहे. 

 

नवी दिल्ली - अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेचा देशातील सर्वांत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज आपले पहिले आरोपपत्र दाखल केले. 

आरोपपत्रामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) माजी प्रमुख उषा अनंतसुब्रह्मण्यन यांच्या कथित भूमिकेचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या उषा या अलाहाबाद बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक आहेत. 

मुंबईस्थित विशेष न्यायालयात दाखल आरोपपत्रामध्ये पीएनबीच्या अनेक अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. उषा या 2015 पासून 2017पर्यंत पीएनबीच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. अलीकडेच या प्रकरणात सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. 

सीबीआयने आपल्या आरोपपत्रात के. व्ही. ब्रह्मजी राव तसेच संजीव शरण या कार्यकारी संचालकांसह महाव्यवस्थापक (आंतरराष्ट्रीय व्यवहार) निहाल अहद यांचीही नावे घेतली आहेत. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी तसेच त्याच्या कंपनीत कार्यकारी म्हणून कार्यरत सुभाष परब यांच्या भूमिकांचाही सविस्तर उल्लेख केला आहे. 
 
चोक्‍सीचा सविस्तर उल्लेख नाही 
सीबीआयने या आरोपपत्रात मेहुल चोक्‍सी याच्या भूमिकेचा सविस्तर उल्लेख केलेला नाही. गीतांजली समूहाशी संबंधित प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करताना त्याच्यासंबंधी सविस्तर उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले. नीरव आणि चोक्‍सी यांनी यापूर्वीच देशातून पलायन केले आहे. 

 

Web Title: in Nirvav Modi case chargesheet filed