निशांतच्या पत्नीचा लॅपटॉप जप्त 

NishantAgrawal
NishantAgrawal

नागपूर : ब्राह्मोस प्रकल्पाचा वैज्ञानिक निशांत अग्रवाल याच्या पत्नीचा लॅपटॉप "एटीएस'ने जप्त केला आहे. पत्नीच्या लॅपटॉपमधून तो पाकिस्तान आणि अमेरिकेला माहिती पाठवीत होता असा आरोप त्याच्यावर आहे, यामुळेच त्याची पत्नी क्षितिजालाही लखनऊ एटीएस ताब्यात घेण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वी निशांत अग्रवाल याच्या घरावर छापा घालण्यात आला होता, त्याने पत्नीचा लॅपटॉप आणि मोबाईलमधून पाकिस्तानी आयएसआय एजंट पूजा रंजन आणि नेहा शर्मा यांना देशाच्या सुरक्षेशी संबंधित फाइल्स पाठविल्याचे "एटीएस'च्या तपासातून समोर आले. त्यामुळेच आता पत्नीचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. त्याच्या कृत्यात पत्नीने काही मदत केली आली काय, याबाबत "एटीएस'कडून चाचपणी सुरू झाली आहे. सोबतच क्षितिजाचे ई-मेल अकाउंटमधून "सेंट मेल' डेटा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
निशांतच्या लॅपटॉपमध्ये काही मालवेअर एटीएसला आढळले आहेत. त्यामुळे निशांत रोज करीत असलेल्या कामांची माहिती पाकिस्तानी एजंट नेहा आणि पूजापर्यंत पोचत असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सर्वप्रथम पोलिसांनी सायबर क्राइमची मदत घेऊन निशांत आणि पत्नी क्षितिजा यांचा लॅपटॉप "सिक्‍युअर मोड'मध्ये ठेवला असून, गरज पडल्यास क्षितिजालाही लखनऊ एटीएस चौकशीसाठी बोलविण्याची शक्‍यता आहे. निशांतची लखनऊ पोलिस कसून चौकशी करीत आहेत. 

फेसबुक अकाउंट बंद 
निशांतच्या फेसबुकवर देशभरातून अश्‍लिल शब्दांत कमेंट्‌स येत होत्या. यासोबतच काही कमेंट्‌स आक्षेपार्ह होत्या. काही समाजकंटकांनी निशांतच्या कृत्याचे समर्थन करीत पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय आगे बढो, अशा कमेंट्‌स केल्या होत्या. देशातील सामाजिक वातावरण दूषित होऊ नये म्हणून "एटीएस'ने सायबर क्राइमच्या मदतीने निशांतचे फेसबुक अकाउंट बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच क्षितिजाचेही फेसबुक अकाउंट बंद करण्यात आल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com