नायब राज्यपालांच्या उपस्थितीवरून केजरीवाल आक्रमक

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

दिल्ली सरकारच्या विविध प्रश्नांच्या मुद्यावर निती आयोग काऊन्सिलची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या विविध महत्वपूर्ण मुद्यांवर चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन केले. तसेच या बैठकीत केजरीवाल यांच्याऐवजी नायब राज्यपालांनी उपस्थिती लावली. त्यावर केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, संविधानच्या कोणत्या नियमांतर्गतस नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या जागी बसण्याची परवानगी देण्यात आली. निती आयोगाच्या  बैठकीला मी त्यांना माझ्याऐवजी उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही.

दिल्ली सरकारच्या विविध प्रश्नांच्या मुद्यावर निती आयोग काऊन्सिलची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या चारही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी टि्वटवर सांगितले, की मी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसह आम्ही आज माननीय पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली. 

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निती आयोगाच्या बैठकीमध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या उपस्थितीवरून एक ट्विट करण्यात आले. केजरीवाल यांच्या ट्विटच्या काहीवेळानंतर निती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी त्यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. 

Web Title: Niti Aayog CEO Amitabh Kant Rejected Arvind Kejriwal Claim Over LG Anil Baijal Attend Meeting