निती आयोगाचा प्रस्ताव प्रादेशिक पक्षांना नष्ट करेल : लालूप्रसाद यादव

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या निती आयोगाच्या प्रस्तावावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी टीका केली आहे. हा प्रस्ताव म्हणजे प्रादेशिक पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पाटना (बिहार) : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या निती आयोगाच्या प्रस्तावावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी टीका केली आहे. हा प्रस्ताव म्हणजे प्रादेशिक पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना यादव म्हणाले, 'लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे म्हणजे प्रादेशिक नेतृत्त्व संपूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव केवळ उच्च वर्गीयांना लाभदायक आहे. मध्यमवर्ग आणि सामान्यांचा कोणी विचार का करत नाही. राष्ट्रीय जनता दल राज्याला विकासाकडे घेऊन जात आहे. जर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही आश्‍चर्यकारक विकास करत असल्याचा विचार करत असतील तर ते चुकीचा विचार करत आहेत.'

भाजप, आरएसएसवाले महिलाविरोधी
ट्‌विटरद्वारे यादव यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. 'आम्ही 'सीता-राम, सीता-राम' म्हणतो आणि भाजपवाले 'जय श्रीराम' म्हणतात. भाजप, संघवाले महिला विरोधी आहेत. म्हणूनच ते सीता मातेला सोडून देतात. सीता आहे तर राम आहे. राम आहे तर सीता', अशा शब्दांत त्यांनी संघ, भाजपवर टीका केली आहे.

Web Title: NITI Aayog's proposal will destroy regional parties : Lalu Yadav