Nitin Gadkari Birthday : २४ व्या वर्षांपासून राजकारणात असलेल्या गडकरींची नक्की संपत्ती किती? | Nitin Gadkari Birthday Property Net worth Maharashtra Politics Union Minister | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari
Nitin Gadkari Birthday : २४ व्या वर्षांपासून राजकारणात असलेल्या गडकरींची नक्की संपत्ती किती?

Nitin Gadkari Birthday : २४ व्या वर्षांपासून राजकारणात असलेल्या गडकरींची नक्की संपत्ती किती?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. गडकरी यांनी सात वर्षांपासून अधिक काळ हे मंत्रालय सांभाळलं आहे. २००९ ते २०१३ काळामध्ये गडकरी यांनी भाजपाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे.

वयाच्या २४ व्या वर्षी नितीन गडकरी यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि अवघ्या ३५ वर्षात ते महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस बनले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय २०१४ पासून सतत सांभाळणाऱ्या गडकरींच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे त्यांचे राजकारण. पण, ते इतर स्त्रोतांमधूनही उत्पन्न मिळवतात.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरींनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्तांसह सुमारे २५.१२ कोटींची संपत्ती आहे. गडकरींनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. नितीन गडकरी यांच्याकडे जंगम संपत्तीच्या रूपात सुमारे ६९,३८,६९१ रुपये आहेत. आणि त्यांच्या पत्नीकडे ९१,९९,१६० रुपये आहेत.

नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात देशभरात रस्ते बांधणीच्या कामात मोठी गती आली आहे. २०२० पर्यंत दररोज ३६ किलोमीटर या वेगाने रस्ते बांधले जात आहेत. देशभरात रस्ते बांधणीला गती देणाऱ्या नितीन गडकरींकडे एकूण सहा गाड्या आहेत. त्यापैकी दोन त्यांच्या आणि चार त्यांच्या पत्नीच्या आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे फॉर्च्युनर आणि इनोव्हा कार आहेत. त्यांचं नागपुरात वडिलोपार्जित घर आहे. मुंबईतील वरळी इथल्या आमदार सोसायटीतही एक फ्लॅट आहे.

गडकरी यांच्याकडे नागपुरातल्या धापेवाडा इथं २९ एकर शेती आहे. यासोबतच नितीन गडकरी आपल्या पगारासह इतर स्रोतांतून मिळून वार्षिक दोन कोटींहून अधिक कमावतात. उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये त्यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीव्यतिरिक्त, ते चित्रपटांमध्येही पैसे गुंतवतात.

नितीन गडकरी केसांच्या व्यवसायातूनही पैसे कमावतात. केस हा त्याच्या उत्पन्नाचा एक स्रोत आहे. ज्यामध्ये ते तिरुपती मंदिरातून विकत घेतलेल्या कापलेल्या केसांपासून अमिनो अॅसिड बनवतात. या व्यवसायातून १२ ते १५ कोटींचा नफा मिळत असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं होतं.

टॅग्स :Nitin Gadkari