Nitin Gadkari : 2020 मध्ये देशात 1.58 लाखांहून जास्त दुचाकी अपघात; 56 हजाराहून जास्त मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari said  over 1.58 lakh two wheeler road accidents took place in india in 2020

देशात 2020 मध्ये 1.58 लाखांहून जास्त दुचाकी अपघात - नितीन गडकरी

देशात रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या प्रचंड आहे. यातच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी संसदेत सांगितले की, 2020 मध्ये भारतात 1,58,964 दुचाकी वाहने रस्ते अपघातांचे बळी ठरले, ज्यामध्ये 56,873 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

त्यांनी पुढे सांगितले की, 2019 मध्ये संपूर्ण भारतात दुचाकी-संबंधित रस्ते अपघातात 56,136 लोकांचा मृत्यू झाला, तर दुचाकी अपघातांची एकूण संख्या 167,184 होती. गडकरी पुढे म्हणाले की, रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक बहुआयामी धोरण तयार केले आहे जे शिक्षण, रस्ते आणि वाहनांचे अभियांत्रिकी, अंमलबजावणी आणि आपत्कालीन काळजी यामुद्द्यांच्या आधारावर रस्ते सुरक्षा लागू करेल.

हेही वाचा: सर्व गाड्यांसाठी 'हे' सेफ्टी फीचर होणार अनिवार्य; नितीन गडकरींची माहिती

'दर चार मिनिटाला एक मृत्यू'

रस्ते अपघातांमुळे मृत्यू आणि गंभीर जखमी होणाऱ्याची सर्वाधिक संख्या असेलेल्या देशांपैकी भारत एक आहे. एका रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी सुमारे 4,50,000 अपघात होतात, ज्यात सुमारे 150,000 लोकांचा मृत्यू होतो आणि बरेच जण जखमी होतात. खरे तर, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होणारा देश भारत आहे. एका रिपोर्टमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसाप भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात आणि दर चार मिनिटाला एक मृत्यू होतो, असा दावा करण्यात आला आहे.

यातील बहुतांश रस्ते अपघातांमध्ये दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या अपघातांचे एक कारण म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न करणे. त्याचवेळी, रस्त्याची खराब स्थिती हे देखील इतर कारणांपैकी एक आहे. तसेच, यातील बहुतांश रस्ते अपघात राष्ट्रीय महामार्गावर होतात.

हेही वाचा: रेडमीचे तीन नवे स्वस्तात मस्त 5G फोन लॉंच; पाहा किंमती अन् फीचर्स

बचावासाठी सरकारचे प्रयत्न

दुचाकी वाहनांच्या या रस्ते अपघातांना रोखण्याच्या प्रयत्नात, MoRTH ने अनेक वेगवेगळी पावले उचलली आहेत. त्याने दुचाकी उत्पादकांना 125cc पेक्षा जास्त इंजिन डिसप्लेसमेंट असलेल्या सर्व दुचाकींमध्ये ABS (एंट्री ब्रेक सिस्टम) फीचर देण्यास सांगितले आहे.

दरम्यान 125cc किंवा त्यापेक्षा कमी पॉवर असलेल्या इंजिन मॉडेल्सना CBS (कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम) देणे अनिवार्य असेल. हा आदेश 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहे. दुसरीकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडाच्या रकमेत सरकारने मोठी वाढ केली आहे.

हेही वाचा: चेन्नईत आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरला आग; चार दिवसांत चौथी घटना

Web Title: Nitin Gadkari Said Over 158 Lakh Two Wheeler Road Accidents Took Place In India In 2020

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nitin Gadkariaccident