आपण विरोधी पक्षात नाही सत्तेत आहोत : गडकरी

आपण विरोधी पक्षात नाही सत्तेत आहोत : गडकरी

नवी दिल्ली : आपण विरोधी पक्षात नसून सत्तेत आहोत हे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लक्षात घ्यायला हवे असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. 

गडकरी म्हणाले की, काम झाले नसल्याचे रडगाणे बंद आधी बंद करा. त्याऐवजी जनतेसमोर सरकारच्या कामाबाबत सकारात्मक बोला. विरोधी पक्षात असतानाही कामं झाली नसल्याची रडगाणी असायची, आताही तुम्ही तेच करत आहात. मात्र, आपण विरोधी पक्षात नाही तर सत्तेत आहोत, याचे भान ठेवा.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातील भाजप खासदारांसोबत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बैठक घेतली यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. खासदारांना त्यांनी यावेळी चांगलीच तंबी दिली. 

दरम्यान, अमित शहा यांच्यासोबत झालेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत प्रीतम मुंडे आणि विकास महात्मे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला. तसेच त्यांनी पक्षाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली. याबरोबरच शिवसेना सोबत आहे का यावर संभ्रम आहे, असे प्रश्नही उपस्थित झाला. यावर शहा यांनी उत्तर दिले की आपण युतीबाबत नेहमीच पुढे आहे. पण, काही जागा गमावून युती होणार नाही. सर्व जागांवर तयारी ठेवावी असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com