मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण लाजिरवाणा : नितीशकुमार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बिहारमध्ये 30 हून अधिक तरुणींनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या तरुणींचा मुझफ्फरपूर जिल्ह्यातील त्यांच्या घरात घुसून छळ करण्यात आला. या प्रकरणानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले. 

बिहारमध्ये 30 हून अधिक तरुणींनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या तरुणींचा मुझफ्फरपूर जिल्ह्यातील त्यांच्या घरात घुसून छळ करण्यात आला. या प्रकरणानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर याप्रकरणावर नितीशकुमार यांनी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी केली. मेडिकल बोर्डच्या पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: Nitish calls Muzaffarpur rape scandal shameful says Nitishkumar