नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात भाजपला ठेंगा!

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

- नितीशकुमार मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न.

- मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या एकाही नेत्याला नाही स्थान.

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवार) करण्यात आला. यामध्ये नऊ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र, संयुक्त जनता दल (जेडीयू)-भाजपचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. 

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त जेडीयूतील नेतेमंडळींना स्थान देण्यात आले. या नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवन येथे आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अशोक चौधरी, नीरज कुमार, लक्ष्मेश्वर राय, शाम रजक, रामसेवक सिंह, बीमा भारती, संजय झा यांच्यासह नरेंद्र नारायण यादव यांना स्थान देण्यात आले. मात्र, भाजपच्या एकाही नेत्याला मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए-2 सरकारमध्ये जेडीयूला एकही मंत्रिपद दिले गेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी केंद्रातील स्थान नाकरले होते. त्यामुळे आता नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपला स्थान देण्यात न आल्याने त्यांची नाराजी उघड झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish Kumar JDU Cabinet Expansion No Any Leader From BJP