बिहारमधील "एनडीए'चा मी नेता नाही - नितीशकुमार

nitish kumar
nitish kumar

पाटणा - ""बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचे आपण प्रमुख असून "एनडीए'चे नेता नाही,'' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (सोमवार) दिले. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) घेतलेल्या काडीमोडाबद्दल बोलताना ते म्हणाले की, कलंकित पक्षाबरोबरील आघाडीचे ओझे वाहणे अशक्‍य झाल्याने राज्यातील महाआघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागला.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज आयोजित केलेल्या लोकसभा संवादात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले,""बिहारमधील 2015च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठी आपले नाव "राजद'चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीच सुचविले होते. मी कलंकित पक्षाबरोबरील आघाडीचे ओझे अधिक काळ वाहू शकत नसल्याने ही युती तोडली. भाजपबरोबर हातमिळवणीमुळे जनादेशाचा अपमान करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. राज्यातील "एनडीए' सरकारचा मी प्रमुख असलो तरी "एनडीए'चा नेता नाही. बिहारमध्ये "एनडीए'चा नेता कोण आहे, या प्रश्‍नाचे उत्तर देताना ते बोलत होते. ""येथे सामूहिक नेतृत्व आहे. कोणत्याही विषयावर मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्व पक्षांना आहे. हा विषय चर्चेचा नाही,'' असे ते म्हणाले.

"एनडीए'मधील घटक पक्षांममध्ये सुरू असलेल्या धुसफुशीबाबत विचारले असता नितीशकुमार म्हणाले, ""मी यापूर्वी सांगितल्यानुसार 2019 मधील लोकसभा निवडणूक जिंकण्यास "एनडीए'ला कोणताही अडथळा येणार नाही. घटक पक्षांबरोबरील "एनडीए'च्या आघाडीबाबत पुढील सार्वत्रिक निवडणुका जाहीर होईपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. "देशाच्या रक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसांत लष्कर उभारू शकतो,' या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्‍तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, यावरून वाद कसा होऊ शकतो. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपली संघटना कायम तत्पर असल्याचाच संदेश त्यांनी यातून दिला आहे.

बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्था चांगली
देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. इतर राज्यांपेक्षा बिहारमध्ये गुन्हेगारीच्या घटना जास्त असणे ही गोष्ट वेगळी आहे. गुन्ह्यांना अधिकाधिक प्रसिद्धी दिल्याने ते कमी करण्यास उपयायोजना आखण्यास मदत होत आहे, हे सांगताना त्यांनी बंगळूरमधील वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासाचा उल्लेख केला. या तपासाच्या प्रगतीबाबत कोणालाही माहिती नाही, असे नितीशकुमार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com