131 विरुद्ध 110 : नितीश कुमार यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

नितीश कुमार यांच्या बाजूने 131 आमदारांनी मतदान केले

बिहारमधील पक्षीय बलाबल
राष्ट्रीय जनता दल : 80 
संयुक्त जनता दल : 71 
भाजप : 53 
कॉंग्रेस : 27 
लोकजनशक्ती पक्ष : 2 
---------- 
बहुमत : 122

पाटणा : लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या प्रमुख सहाकारी घटकपक्षांना धक्का देत भाजपच्या पाठिंब्यावर नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. नितीश कुमार यांच्या बाजूने 131 आमदारांनी मतदान केले, तर 110 आमदारांनी विरोधात मतदान केले. 

बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनंतर नितीशकुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडत मुख्यममंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि काल (गुरुवार) पुन्हा त्यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडत तो 131 मतांनी जिंकला. 

तेजस्वी यादव यांच्यासह राजदच्या आमदारांनी बिहार विधानभवनाबाहेर नितीश कुमार यांच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी जोरदार निषेध केला. दरम्यान, संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप यांच्या सरकार स्थापनेविरोधात एकयाचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर 31 जुलैपूर्वी सुनावणी अशक्य असल्याचे पाटणा उच्च न्यायालय म्हटले आहे. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री

Web Title: nitish kumar news nitish kumar wins trust vote bihar assembly