esakal | नितीश यांच्याकडेच नेतृत्व राहणार - नड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

nitish-kumar-and-JP-nadda

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २२० जागा मिळतील आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले जाईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केला.

नितीश यांच्याकडेच नेतृत्व राहणार - नड्डा

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २२० जागा मिळतील आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले जाईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नड्डा हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीतील जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ही केवळ औपचारिक भेट होती, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. बिहारमधील २४३ जागांमध्ये समान वाटप व्हावे अशी नड्डा यांची मागणी आहे. मात्र भाजपपेक्षा जास्त जागांवर लढणार असल्याचे संयुक्त जनता दल पक्षाने स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नड्डा व बिहार निवडणुकीचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथे शुक्रवारी आगमन झाले. त्या वेळी बैठकीत त्यांनी ‘एनडीए’च्या विजयासाठी सर्वांनी काम करण्याचे निर्देश दिले. दुसऱ्या पक्षासाठी काम करीत असल्याची भावना मनात आणू नका असे सांगून अति आत्मविश्‍वासाने नुकसान होऊ शकते, याकडेही लक्ष वेधले.

Edited By - Prashant Patil