नितीश हे तेजस्वीसमोर झुकतील - चिराग पासवान

वृत्तसंस्था
Friday, 6 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील शेवटच्या प्रचारात लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांनी ‘‘दहा तारखेनंतर नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांच्यासमोर झुकताना होताना दिसतील,’’ अशी प्रखर टीका गुरुवारी केली. बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांसाठी शनिवारी (ता.७) मतदान होणार आहे.

नवी दिल्ली/पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील शेवटच्या प्रचारात लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांनी ‘‘दहा तारखेनंतर नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांच्यासमोर झुकताना होताना दिसतील,’’ अशी प्रखर टीका गुरुवारी केली. बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांसाठी शनिवारी (ता.७) मतदान होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पत्रकारांशी बोलताना चिराग यांनी भाजप- एलजेपीचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा पुन्हा एकदा केला. ज्या पंतप्रधानांवर टीका करताना थकत नव्हते त्यांच्याबरोबर आज व्यासपीठावर नतमस्तक होताना ते थकत नव्हते. नितीश कुमार यांची खुर्चीबद्दलची हाव त्यातून दिसली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत ‘एलजेपी’ची कामगिरी चांगली झाली आहे. नितीश कुमार यांना १० नोव्हेंबरला मुख्यमंत्री निवास सोडावे लागेल. ‘एलजेपी’चे उमेदवार मोठ्या प्रमाणावर जिंकून येतील. 

भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्याला अटक

चिराग पासवान म्हणाले

  • मी अद्याप स्वतःला मुख्यमंत्र्याच्या रूपात पाहत नाही
  • नितीश कुमार यांनी पाच वर्षांची हिशेब द्यावा.
  • त्यांच्यामुळे बिहारमधून स्थलांतर वाढले.
  • माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यास वेळ, पण स्वतःबद्दल कधी बोलणार?
  • पुढील पाच वर्षांचे धोरण हे काय हे त्यांनी सांगावे.

अमित शहांची लंच डिप्लोमसी पश्चिम बंगालच्या लोकांना पचणार का?

कांदाफेकीचा निषेध 
‘नितीश कुमार यांच्या सत्ताकाळात बिहारमध्ये भ्रष्टाचारात सर्वाधिक वाढ झाली. त्यांच्या कार्यकाळात पूर आला नाही असे एकही वर्ष गेले नाही. ‘सात निश्‍चय’ दारूबंदी ही भ्रष्टाचाराची कुरण ठरली आहेत, असा आरोप पासवान यांनी केला. मात्र नितीश कुमार यांच्या सभेत कांदाफेकीच्या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला. ते म्हणाले की, जनतेचा आक्रोश स्वाभाविक आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish will bow before tejashwi yadav chiraj paswan politics