3, 4 फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रातील जाहिरातीवर निर्बंध

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : पाच राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना आणि अन्य कोणत्याही व्यक्तीला सरकारच्या प्रमाणपत्राशिवाय तीन आणि चार फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुद्रित माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिराती प्रसिद्ध होत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आयोगाने तीन आणि चार फेब्रुवारी रोजी माध्यम प्रमाणिकरण आणि निरीक्षक समितीच्या (एमसीएमसी) परवानगीशिवाय जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. एमसीएमसीच्या प्रमाणपत्राशिवाय वृत्तपत्रांनी जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, अशा सूचना गोवा आणि पंजाबमधील वृत्तपत्रांनाही देण्यात आल्या आहेत. जाहिरातींच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Web Title: No add on 3, 4 Feb in Newspaper