'आप'सोबत युती नाही : काँग्रेस

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

मागील महिन्यापासून काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय चर्चा रंगली होती. तसेच काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांकडून आघाडी करण्याबाबतचे संकेत मिळत होते. मात्र, आज अजय माकन या सर्व शक्यतांवर पूर्णविराम दिला.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामुळेच देशात मोदी नावाच्या राक्षसाचा उदय झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही हातमिळवणी करणे शक्यच नाही, असे काँग्रेस नेते अजय माकन यांनी सांगितले. माकन यांच्या या विधानामुळे काँग्रेस 'आप'सोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट झाले.

मागील महिन्यापासून काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय चर्चा रंगली होती. तसेच काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांकडून आघाडी करण्याबाबतचे संकेत मिळत होते. मात्र, आज अजय माकन या सर्व शक्यतांवर पूर्णविराम दिला. माकन म्हणाले, ''आम्ही आम आदमी पक्षासोबत जाणे अशक्य आहे. मोदी नावाच्या राक्षसाचा उदय हा केजरीवालांमुळेच झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही''. तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, अजय माकन यांनी आघाडीबाबतचे संकेत सपशेल फेटाळून लावले असलेतरी आपचे नेते दिलीप पांडे यांनी आघाडीसाठी काँग्रेस इच्छुक असल्याचे सांगितले असून, काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आपच्या संपर्कात आहेत. तसेच आम्हाला काँग्रेसची नाही तर काँग्रेसला आमची गरज असल्याचेही पांडे यांनी सांगितले.

Web Title: No Alliance With AAP says Congress Ajay Maken