इम्रान खान यांच्या बचावासाठी धावला 'हा' भारतीय नेता

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे.

वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे.

मात्र या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला.

दरम्यान, इम्रान खान  हे त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या शासकीय निवासस्थानी राहतील. विमानतळावर त्यांच्या स्वागताना परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. खान त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Big Welcome for Imran Khan in US, Received by His Own Foreign Minister Instead