भाजप कार्यालयात नेत्याने केला पत्नीवर हल्ला

वृत्तसंस्था
Friday, 20 September 2019

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नेत्याने पत्नीवर हल्ला केल्याची घटना घडली. पती-पत्नीमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नेत्याने पत्नीवर हल्ला केल्याची घटना घडली. पती-पत्नीमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांमधील वैयक्तीक वादातून ही घटना घडल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

पक्षाचे नेते आजाद सिंह यांनी त्यांची पत्नी व दक्षिण दिल्लीच्या माजी महापौर  यांच्यावर प्रदेश कार्यालयात हल्ला केला. दोघांमध्ये घटस्फोटावरून वाद सुरू असून, यामधून ही घटना घडली आहे, असे पक्षाच्या अन्य नेत्यांनी सांगितले.

दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले, महिलांना सन्मान राखायला हवा. घडलेल्या घटनेच्या चौकशीबाबत एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून, आजाद सिंह यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, 'पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये भांडण सुरू असून, घटस्फोटाच्या मार्गावर आहेत. परंतु, महिलेवर हात उचलणे योग्य नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no compromise with the dignity of a woman Manoj Tiwari BJP Leader Azad Singh slapping wife in viral video