मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीः राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, फक्त चार लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. तुम्ही रोजगाराच्या नावाने भजी तळण्याचा सल्ला दिला आहे, अशी टीका काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. मी पंतप्रधानांवर आरोप केलेत, पंतप्रधान मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, फक्त चार लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. तुम्ही रोजगाराच्या नावाने भजी तळण्याचा सल्ला दिला आहे, अशी टीका काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. मी पंतप्रधानांवर आरोप केलेत, पंतप्रधान मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

लोकसभेत बोलताना गांधी म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी निवडणूकीपूर्वी विविध आश्वासने दिली होती. या आश्वासनांमध्ये प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याबरोबरच 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते. शेतकरी, विद्यार्थी युवक हे मोदींच्या भुलथापांना बळी पडले आहे. मोदी सरकारने केवळ चार लाख युवकांना रोजगार दिला आहे. रोजगाराच्या नावाने त्यांनी भजी तळण्याचा सल्ला दिला. चीन 24 तासात 50 हजार युवकांना रोजगार देतो. मात्र, मोदी सरकार 24 तासात अवघ्या 400 युवकांना रोजगार देत आहे.'

नोटाबंदी हा मोदींचा सर्वात मोठा विनोद आहे. कुठून 'मेसेज' मिळाला माहीत नाही; पण अचानक रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी करून टाकली. 'जीएसटी'मध्ये एकच दर असावा, असा आमचा प्रस्ताव होता. पण भाजपच्या 'जीएसटी'मध्ये पाच वेगळे दर आहेत आणि कोट्यवधी लोकांना 'बरबाद' केले आहे. जीएसटीने कोट्यवधींना लुबाडले, बड्या उद्योगपतींसाठी मोदी काम करतात, शेतकरी, बेरोजगार, तरुणांची पदरी केवळ भूलथापा आहेत. पंतप्रधान मोदी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांशी बोलत नाहीत. ते फक्त 'सूट-बुट'वाल्या लोकांशीच चर्चा करतात, असे गांधी म्हणाले.

राफेल डीलवरून राहुल गांधी यांनी हल्लाबोल करताना म्हणाले, 'पंतप्रधानांनी एखाद्या जादूप्रमाणे राफेल कराराची किंमत वाढवली. 520 कोटींचे विमान 1600 कोटींना खरेदी केले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन सुद्धा खोटे बोलल्या आहेत. फ्रान्स सरकारशी गोपनीयतेचा करार झाल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे.'

मोदी गुजरातेत चीनच्या राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते, त्यावेळी सीमेवर चीनचं सैन्य घुसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नव्हे तर भागीदार आहेत. मोदींनी उद्योगपतींचं अडीच लाख कोटींचं कर्ज माफ केले, मात्र शेतकरी कर्जमाफी केली नाही. मित्रांच्या खिशात पैसा जावा म्हणून मोदी भारतात पेट्रोलचे दर वाढवत आहेत. मी पंतप्रधानांवर आरोप केलेत, पंतप्रधान मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

Web Title: No confidence motion Rahul Gandhi statement in lok sabha