व्हिडिओनंतर 'त्या' जवानाशी संपर्क नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नवी दिल्ली - एका व्हिडिओद्वारे लष्कराची लक्तरे वेशीवर टांगत, दररोज मिळत असलेल्या जेवणाचा दर्जा व्हिडिओतून सर्वांसमोर आणणारा सीमा सुरक्षा दलाचा जवान (बीएसएफ) संपर्कात नसल्याची तक्रार

नवी दिल्ली - एका व्हिडिओद्वारे लष्कराची लक्तरे वेशीवर टांगत, दररोज मिळत असलेल्या जेवणाचा दर्जा व्हिडिओतून सर्वांसमोर आणणारा सीमा सुरक्षा दलाचा जवान (बीएसएफ) संपर्कात नसल्याची तक्रार

तेज बहादूर यादव नावाच्या जवानाने व्हिंडिओतून लष्करातील काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. सीमेचे संरक्षण करताना निकृष्ट जेवण मिळत असल्याने अनेकवेळा उपाशी झोपत असल्याचेही त्याच्या व्हिडिओतून समोर आले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तेजच्या पत्नीने हा व्हिडिओ समोर आल्यापासून पतीशी संपर्क होत नसल्याचे फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे. पत्नीने लिहिले आहे की, 'या देशातील नागरिकांना नमस्कार. सोमवारी संध्याकाळपासून माझा पतीशी संपर्क होऊ शकत नसल्याचे मला सोशल मिडियाद्वारे लोकांना सांगायचे आहे. त्यांना कोठे आणि कोणत्या परिस्थितीत ठेवले आहे हे देखील आम्हाला माहिती नाही.'

तेज बहादूर यांनी व्हिडिओतून काही धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. त्याने या व्हिडिओत म्हटले आहे की, "सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेले सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकतात. अनेकवेळा तर उपाशी झोपावे लागते. आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास बर्फात उभे राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थिथीत कर्तव्य पार पाडतो.'

Web Title: No contact with BSF jawan after viral video