दहशतवाद्यांवर नोटाबंदीचा परिणाम नाही- दिग्विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पणजी (गोवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली असली तरी दहशतवादी हे डिजिटल यंत्रणेचा वापर करत असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे.

राज्य मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बोलताना दिग्विजयसिंग म्हणाले, 'मोदींनी नोटांवर घातलेल्या बंदीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसत आहे. मोदींनी भारतीयांना अवघड परिस्थितीत टाकले आहे. दहशतवादी हे डिजिटल यंत्रणेचा वापर करत आहेत. शिवाय, ते मोठ्या प्रमाणात आमली पदार्थांची तस्करी करत असल्याने त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.'

'पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे दहशतवाद बंद होऊ शकतो, याबद्दल सरकारला विश्वास आहे का? जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी ठार मारलेल्या दहशतवाद्याकडे दोन हजार रुपयांची नोट मिळाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना अद्याप दोन हजार रुपयांची नोट मिळाली नाही. परंतु, दहशतवाद्यांकडे कोठून आली, याचाही विचार करायला हवा,' असेही दिग्जिजयसिंग म्हणाले.

Web Title: no effect of demonetisation on terrorists-digvijay